तुळजापूर /प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वीज पुरवठा सातत्याने अचानक खंडीत होत असल्याने शहरवासियांबरोबर  भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  मागील एक आठवडा पासुन राञी अचानक पणे कुठल्या ना कुठल्या भागातील वीज पुरवठा खंडीत होत असल्याने भाविकांचे हाल होत आहे.
अचानक वीजपुरवठा खंडीत होत असल्याने देवीदर्शनार्थ राञी गेलेले व देवीदर्शन  करुन परत येणा-या भाविकांना आपले निवासास्थान शोधणे ञासदायक ठरत आहे.  रविवारी राञी मंदीर शेजारी असणा-या शुक्रवार पेठ भागातील वीजपुरवठा सुमारे पाऊण तास खंडीत झाल्याने भाविकांन सह या भागातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भाविकांच्या सोयीसाठी सातत्याने खंडीत होणारा वीजपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी होत आहे

 
Top