तुळजापूर/प्रतिनिधी -
करोना आजाराच्या पाश्र्वभूमीवर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक कमी होवुन भाव घसरत असल्याने करोनाचा फटका शेतक-यांना बसत असल्याचे दिसुन येत आहे. सर्वाधीक फटका सोयाबीनला बसला असुन अवघ्या महिनाभरात सोयाबीनच्या भावात एक हजार रुपयाची घट झाली आहे.करोनाचा फटका शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती, आडत्या व हमाल यांना बसला आहे. सध्य परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट पसरला आहे.
आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मधील पन्नास आडत दुकांनाचा आर्थिक व्यवहार मंदावला असुन येथे काम करणारे अधिकृत ६० ते ६५ हमालांचा तसेच इतर मजुर वाहनचालक मालक यांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महिनाभरापुर्वी सोयाबीन भाव 4400 रुपये होता,आता 3375 ते 3400 रुपया पर्यत खाली आला आहे. आपले सोयाबीन चीन रशियाला निर्यात होते पण निर्यात थांबल्याने तसेच 18 लाख टन पामतेल परदेशातुन आयात केल्याने सोयाबीन भाव घसरुन शेतक-यांना याचा मोठा अर्थीक फटका बसत असल्याचे दिसुन येत आहे.