उस्मानाबाद/प्रतिनिधी- जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणा-या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे.
 महाराष्ट्र राज्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालीन उपायोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर,राज्यात कोरोना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यास्तव राज्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी दि.17 मार्च 2020 रोजी परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये,यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधा वस्तूंचे वितरण करताना लाभाथ्र्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटपाची सुविधा दि.17 मार्च 2020 पासून ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
यामुळे लाभाथ्र्यांना ई-पॉस उपकरणावर बोट/अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यामुळे  विषाणूचा संसर्ग टाळता येईल.तसेच रास्तभाव दुकानांवर गर्दी होणार नाही, याकरिता टोकन देऊन लाभाथ्र्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना सर्व रास्तभाव दुकानदार यांनी शिधापत्रिकाधारकांना द्याव्यात. धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेऊन उभे राहतील,याची दक्षता रास्तभाव दुकानदारांची घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
तसेच या सुविधेद्वारे लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना धान्याचा अपहार/अनियमितता होणार नाही, याची दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी. वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार यांची राहणार असून ही सुविधा दि.31 मार्च 2020 पर्यंतच लागू राहील.
 त्यानुषंगाने या सुविधेचा लाभ घेऊन पात्र लाभाथ्र्यांना धान्य देण्याची कार्यवाही सर्व रास्तभाव दुकानदारांनी करावी, एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यावाचून वंचित राहणार नाही,याची दक्षता घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.तसेच सर्व लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले माहे मार्च 2020 चे धान्य उचल करावे,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.चारुशीला देशमुख यांनी केले आहे.
 
Top