उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील बार्शी नाका ते बोंबले हनुमान चौक परिसराचा विकास कामाला नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थात प्रितम भैय्या मुंडे विचार मंचच्यावतीने दि. 9 मार्च रोजी आंदोलन करण्यात आले होते. याच आंदोलनाची दखल घेत नगरपालिकेने या भागातील अतिक्रमण काढणे, नाली स्वच्छतेची कामे नगरपालिकेने हाती घेतली आहेत.
उस्मानाबाद येथील बार्शी नाका ते बोंबले हनुमान चौक या ठिकाणी नागरिकांना लागणा-या मुलभूत सुविधा मिळत नसल्याने या ठिकाणी राहणा-या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच नागरिकांनी प्रितम मुंडे विचारमंचच्या माध्यमातून आपल्या परिसरातील समस्या नमूद करून हजारो अर्ज विचार मंचाकडे सादर केले होते. याच अर्जाची दखल घेवून मंचाच्यावतीने दि. 9 मार्च रोजी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत दि. 19 मार्च रोजी या कामाचा शुभारंभ चंद्रसेन जाधव, प्रितम मुंडे, सुरेश गवळी, अमित उंबरे, धनंजय मुंडे, दादा मुंडे, अमोल सुरवसे, लखन मुंडे, रतन जाधव, दिनेश देशमुख, पुनगुडे आदींच्या उपस्थितीत या भागातील तुंबलेल्या नाल्या, गटारी स्वच्छ करण्याच्या कामास प्रारंभ केला असून, या भागात करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यासही नगरपालिकेने सुरूवात केली आहे. याचबरोबर रोडच्या कामाचा पाठपुरावाही प्रितम मुंडे विचार मंच करीत आहे. तेही काम लवकरात लवकर मार्गी लागेल असेही आश्वासनही प्रितम मुंडे यांनी दिले आहे. 
 
Top