लोहारा/प्रतिनिधी
पंतप्रधान जन - कल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियानाच्या उमरगा तालुकाध्यक्ष पदी शुभम मुळजकर तर तालुका सरचिटणीस पदी वैभव इगवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व तसेच तालुका उपाध्यक्ष पदी संदीप पाटील, सचिन कुन्हाळे, चिटणीसपदी सौरभ पाटील, मारुती होगाडे, कोषाध्यक्षपदी अमित तुकशेट्टी, तालुका कार्यकर्णी सदस्य रविशंकर माडीवाल यांची निवड करण्यात आली.
शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवणारी व युवा चारित्र्य संपन्न युवा भारतीय संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करणारे यासाठी लक्ष देणारे एकमेव संघटना म्हणजे पंतप्रधान कल्यानकारी योजना प्रचार अभियान होय. या निवडीचे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिध्दीविनायक संस्थापक तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश का.सदस्य अँड.मिलिंद पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, जि.प.चे बांधकाम व अर्थ माजी सभापती अभय भैय्या चालुक्य, भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास शिंदे, जि.प.चे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, बालाजी कोराळे, अदिंनी केले.

 
Top