लोहारा/प्रतिनिधी-
जागृत देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या लोहारा तालुक्यातील वडगाव येथील श्री. रामलिंगेश्वर देवस्थानची यात्रा व सर्व धार्मिक कार्यक्रम कोरानामुळे रद्द करण्यात आले. याबाबतच निर्णय रविवार दि.15 मार्च रोजी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी घेतला. ह
जारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोहारा तालुक्यातील वडगाव ( गां) येथे मागील 127 वर्षापासुन श्री रामलिंगेश्चर यात्रा मोठया उत्साहात साजरी होते. या यात्रेमध्ये हजारो भाविक दररोज येत असतात व पुणे, मुंबई व परगावी असलेले गावातील रहिवाशी या यात्रेसाठी आवर्जुन उपस्थित असतात व गावातील लेकी यात्राला उपस्थिती लावतात. परंतु या वर्षी कोरोनामुळे सार्वजनिक, धार्मिक , सांस्कृतिक घेण्यास प्रशासनाने प्रतिबंध लागु केल्याने याची खबरदारी घेऊन यात्रा कमिटीने रविवार दि.15 मार्च रोजी ग्रामस्थांची बैठक बोलावून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दि.18 ते 24 मार्च दरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ , किर्तन, कुस्ती, काला, लावण्य खाणी आदी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटी व  ग्रामस्थांनी घेतला. यावेळी सरपंच बबन फुलसुंदर, उपसरपंच लक्ष्मण भुजबळ, पोलीस पाटील मारूती लोहार , चेअरमन बिभीषण पवार, माजी सरपंच भागवत फुलसुंदर, बसवराज माशाळकर , बालाजी साळुंके, शंकर पाटील, विलास फुलसुंदर, सुभाष भुजबळ, राम गिराम, सुधाकर साळुंके, शंकर लोहार, दशरथ फुलसुंदर , संजय फुलसुंदर, गोरख बेळे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

 
Top