परंडा /प्रतिनिधी -
ऐतिहासिक परंडा तालुक्यातील डोंजा येथे खैरी नदीपात्रात गाळ काढतांना सापडलेल्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांची इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज चे आजीव सदस्य अजय माळी हे नवी दिल्ली येथे दि. 21 मार्च रोजी सादरीकरण करणार आहेत.

इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही भारतातील एक अग्रगन्य संस्था असून जगातील एक मोठी संस्था म्हणूनही इंटॅकचा उल्लेख केला जातो. देशाच्या सांस्कृतिक व प्राकृतीक वारशांबाबत जागृती, नैसर्गीक संसाधने व संपत्ती, पारंपारीक कला शील्पांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन देऊन मदत करते. अजय माळी हे इंटॅकचे आजीव सभासद असून इंटॅकच्या पदसीध्द सदस्यांमध्ये भारत सरकारमधील संस्कृती मंत्रालयाचे सचिव, वन मंत्रालयाचे सचिव, नागरी विकास मंत्रालयाचे सचिव, नॅशनल म्युझीअमचे महासंचालक, भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक, भारतीय नेव्ही, भारतीय आर्मी तसेच तज्ञ संशोधकांचा समावेश आहे.
ऐतिहासिक परंडा तालुक्यातील डोंजा येथे खैरी नदीपात्रात गाळ काढतांना सापडलेल्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांमुळे जिल्हयास मोठी प्रसिध्दी मिळाली आहे. आता इंटक मुळे जगभरात प्रसिद्धी होणार आहे. जिल्हयाचा पर्यटनातुन आर्थीक विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.