तुळजापूर / प्रतिनिधी-
उन्हाळा आरंभ होताच असाह्य उष्णतेपासुन श्रीतुळजाभवानी मातेस पंख्याने दुपारी वारा घालण्याची परंपरा असुन त्या परंपरेस गुढीपाडवा सण झाला कि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दि25 चैञ शुध्द व्दितीया पासुन  प्रारंभ करण्यात आला
गुरुवार दि 25 पासुन श्रीतुळजाभवानी मातेस मखमली पंख्याने वारा घालण्यास आरंभ होतो श्री तुळजाभवानी मातेस दही, दुध, पंचामृत, अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर देवीस वस्ञोलंकार घालण्यात येतात नंतर धुपारती केली जाते व दुपारी ऊन वाढुन असाह्य उकाडा सुरु होताच या असाह्य उकाड्यापासुन श्री  तुळजाभवानी मातेची सुटका व्हावी म्हणून दुपारी एक ते चार या कालावधीत अखंड पणे मखमली कापड्याने तयार केलेल्या पंख्याने वारा घालण्याची सेवा सुरु करण्यात आली असुन ही सेवा करण्याचा मान  सेवेदार पलंगे घराण्याकडे आहे.
या कालावधीत देवीगर्भगृहात कुणालाही प्रवेश दिला जात नाही .या कालावधीत देवीस लिंबु शरबताचा नैवध दाखवला जातो. देवीस पंख्याने वारा घालण्याची सेवा  मृग नक्षञाचा दमदार पाऊस पडेपर्यत केली जाते . ही परंपरा अनादी कालापासुन चालु असुन ती आजही पाळली जाते.
 
Top