नळदुर्ग/प्रतिनिधी-
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा महिला व बाल संस्कार प्रमुख म्हणून प्रणिता मिटकर यांची निवड करण्यात आली
. प्रणिता मिटकर या एकलव्य आश्रमशाळा यमगरवाडी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. भटके-विमुक्तातील मुलांसाठीचे त्यांचे कार्य, किशोरी विकास मेळाव्यातून मुलींसाठी आयोजित केलेली प्रशिक्षण वर्ग, दासबोधाच्या माध्यमातून महिलांमध्ये केलेली जनजागृती,वात्सल्य सामाजीक संस्थेच्या मार्फत पाणी, गोसेवा, वृक्ष संवर्धन यात केलेली कामे या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती केल्याचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले. उस्मानाबाद येथील यशराज मंगल कार्यालय येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. दिगंबर महाराज खोत व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.