नळदुर्ग/प्रतिनिधी-
येथील कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणच्या वतीने याही वर्षी दि.2 मे 2020 रोजी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, तरी गोर गरीब व गरजू वधु वरांनी या होणा-या सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयामध्ये आपली नावे नोंदवावीत असे आवाहन कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा तुळजापूर तालुक्याचे नेते अशोक जगदाळे यांनी केले आहे.
सन 2014 पासून नळदुर्गचे सुपूत्र तथा तालुक्याचे नेते अशेाक जगदाळे यांनी आपल्या आई वडीलांच्या नावे प्रतिष्ठाणची स्थापना करुन या प्रतिष्ठाणच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील गोर गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी यांच्या मुला मुलींचे मोफत लग्न लावून देण्याचा एक चांगला उपक्रम चालू केला आहे. गेली सहा वर्षे हा उपक्रम अखंडपणे चालू आहे, गेल्या तीन वर्षापासून तर या विवाह सोहळयाची व्याप्ती अणखीनच वाढली आहे त्यामुळे तुळजापूर तालुक्यात नळदुर्गसह तामलवाडी, काक्रबा व उस्समानाबाद तालुक्यातील चिखली या गावामध्ये ही सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या सामुदायीक विवाह सोहळयाच्या माध्यमातून अशोक जगदाळे यांनी जवळपास पाचशे कुटूंबातील गोर गरीब मुला मुलींचा मोफत विवाह लावून देवून स्वत: त्यांनी कन्या दान पध्दतीने विवाह सोहळे साजरे केले आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या आता पर्यंतच्या सर्व सामुदायीक विवाह सोहळयास नागरीकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. दरम्यान या सामुदायीक विवाह सोहळयाच्या माध्यमातून अशोक जगदाळे यांनी आपल्या मातृभूमीतील गोरगरीब, शेतकरी आणि शेतमजूर व कष्टकरी नागरीकांच्या साठी सामाजिक कार्य केले आहे.
त्याच बरोबर या वर्षी ही अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग येथे बालाघाट कॉलेजच्या मैदानात दि. 02 मे 2020 रोजी सायंकाळी 6 वाजून 45 मिनीटांनी या सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयाचे आयोजन  करण्यात आले आहे तरी या सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयामध्ये ज्या कोणाला आपल्या मुला मुलींचे विवाह करावयाचे आहे त्यांनी कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाचे कार्यालय डिएड कॉलेज शेजारी असलेल्या कार्यालयात नाव नोदंणी करावी व त्याच बरोबर नवल जाधव, महेश जळकोटे, बबलू जगदाळे, राजकुमार पाटील सुजित बिराजदार यांच्या कडे नावे नोंदविण्याचे आवाहन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांनी केले आहे.
 
Top