तुळजापूर /प्रतिनिधी-
प्रयास संस्था, मुंबई व टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूरच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील समाजकार्य महाविद्यालयांसाठी "गुन्हेगारी न्यायामध्ये सामाजिक कार्याचा हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आणि व्याप्ती"  या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शाळा, काँलेज मधील विद्याथ्र्यांमध्ये जनजागृती केली करण्यात आली.
यावेळी प्रा. रमेश जारे, प्रयासचे सामाजिक कार्यकर्ते सुनील मस्के,  मुरलीधर जगताप, सिद्धार्थ डोळस, सुजाता जगताप,  रीना जैसवार, सुरेंद्र  वाघमारे, चंद्रकांत  शिंदे,  विजय जोहारे , डॉ. नीलम यादव, सहाय्यक कुलसचिव शरथ बी, आनंद भालेराव यांनी  मार्गदर्शन केले.  ही कार्यशाळा यशस्वी  प्रयासचे संचालक डॉ. विजय राघवन व सह संचालक डॉ़ शेरॉन मेनझिस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या कार्यशाळेत नांदेड, परभणी, उस्मानाबाद,  जालना येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक अरविंद लोणकर,  डॉ. सरोदे, प्रा.प्रशांत वनान्जे,  प्रा. राहुल हिवराळे प्रा. प्रकाश शिंदे तसेच टीसचे सामाजिक कार्यकर्ते शंकर ठाकरे, शीतल मोरे,  स्वाती वाघमारे, सोनाली जोहारे यांनी सहभाग घेतला.

 
Top