कळंब /प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत असलेले हनुमंत पाटुळे यांची मानवहीत लोकशाही पक्षाच्या उस्मानाबाद जिह्याच्या अध्यक्ष पदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचीन साठे यांनी 28 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.
 मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथे प्रमुख पदाधिका-यांची बैठक व एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. या निवडीच्या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रंजनाताई बलसाने,महासचीव गणेश भगत, पुणे जिल्हाध्यक्षा सावित्रीताई क्षिरसागर, यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top