
वाशी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत गोधळी कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस एसएएम श्रेणीतील बालकांच्या माता व त्याच अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश मुंडे यांनी गोधळी प्रकल्प हा एसएएम श्रेणीतील बालकांच्या मातासाठी असून सदर प्रकल्पातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे, यामुळे जास्तीत जास्त मातांनी चांगले प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले .या प्रशिक्षणास प्रशिक्षण देण्यासाठी सौ.मैमुदा शेख लाखानगाव यांनी गोधळी शिवण्याचे प्रशिक्षण दिले.सदर प्रशिक्षणासाठी श्रीमती इंदू महाले ,उर्मिला भारती ,किसनाबाई मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.