उस्मानाबाद/प्रतिनिधी-
रोजगार उपलब्धीसाठी रूपामाता नॅचरल शुगर सारखे अनेक कारखाने उभे करू न सर्वसामान्याच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देवू  तसेच  रूपामाता उद्योग समूहाने सर्वसामान्य शेतक-यांचे हित जपण्याचा नेहमीच प्रयत्न  केले आहे. या उद्योग समुहाची अशीच भरभराट होवो अशी मी आशा व्यक्त करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन ओमप्रकाश ऊर्फ काकासाहेब कोयटे यांनी रूपामाता नॅचलर शुगरच्या 2,71,101 च्या गुळपावडर पोत्याचे पुजन करताना केले.
 यावेळी रूपामाता उदयोग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्री.व्यंकटराव गुंड, गुरुनाथ बडोरे (महाराष्ट्र लिंगायत समाज प्रदेशाध्यक्ष), शिवानंद कथले (जिल्हाध्यक्ष लिंगायत समाज),  दत्ताभाऊ कुलकर्णी (माजी जिल्हाध्यक्ष भाजपा), सुधाकर गुंड गुरूजी (माजी जि.प.उपाध्यक्ष), सुधाकर पवार, अॅड.निवृत्ती कुदळे,  सुर्यकांत गरड, अॅड.शरद गुंड,  सचिन गुंड,संदिप गुंड, शिवाजी माळी,  कळसकर, खिलारे, पाटील व तसेच पाडोळी (आ) पंचक्रोशीतील शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

 
Top