कळंब/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या सर्व शाळा मध्ये सोलर प्लँट बसवुन शाळेतील विजेचा कायम स्वरुपी प्रश्न मिटवला जाईल अशी ग्वाही जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे यांनी दिली.
दि.1 मार्च रोजी श्रीशुभमंगल कार्यालय कळंब येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक मेळावा व प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन प्रा.कांबळे  बोलत होत्या .प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन कळंब-उस्मानाबादचे आ. कैलास पाटील , शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात,महीला व बालकल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितिन काळे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे  पंचायत समितीच्या सभापती संगिता वाघे, उपसभापती गुणवंत पवार शिक्षक संघाचे प्रदेशकार्याध्यक्ष अंबादास वाजे ,सरचिटणीस आप्पासाहेब कुल ,शेख इसाक पटेल, विनोद राऊत  गटशिक्षणाधिकारी संजिव बागल इत्यादी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना प्रा.कांबळे म्हणाल्या की उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हापरिषद च्या शाळा या गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणाऱ्या आहेतच उत्साही व उपक्रमशिल शिक्षकामुळेच या बाबी साध्य होत आहेत भविष्यात ही शिक्षकांचे ,शिक्षणाचे व विद्याथ्र्यांंचे प्रश्न सोडवण्या साठी मी प्रयत्नशिल राहील शिक्षक संघाच्या माध्यमातून संस्था,शाळा व शिक्षकांना यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा प्रेरणा पुरस्कारा मुळे इतरांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल
आमदार कैलास पाटील म्हणाले की  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे काम प्रेरणादायी असून, शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नाबरोबर ग्रामीण भागातील गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक संघाने पुढाकार घेतला आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने प्राधान्य देणार असून मराठवाडा विभागातील वैद्यकीय प्रवेशावेळी विद्याथ्र्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पाठ पुरावा करणार आहे
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात म्हणाले कि, महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न शिक्षक संघाच्या व्यासपीठावर सुटले असून, प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यात शिक्षक संघाचा मोलाचा वाटा आहे. प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन व बदल्यासह इतर प्रश्नाबाबत संघाचा पाठपुरावा असून शासन सकारात्मक आहे. राज्यातील शिक्षकांच्या प्रमुख  मागण्या मान्य करून घेण्यासाठी शुक्रवार दि.13 मार्च 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता रीलायन्स कंपनी फुटबाल मैदान नागोठाणे ता.रोहा जी.रायगड (अलिबाग) येथे प्राथमिक शिक्षक संघाचे भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, यास सर्व शिक्षक बांधवानी सहपरीवर उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवून घेवू असे अवाहनही यावेळी त्यांनी केले. प्रसंगी नितीन काळे यांनी बोलत असताना सांगितले कि, आगामी काळात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कार्य चांगले असून शिक्षक व शिक्षणाच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने शिक्षक संघाच्या पाठीशी राहू. शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आपल्या प्रस्ताविकातुन शिक्षक संघाच्या माध्यमातुन शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न व प्रेरणा पुरस्कार देण्याची भुमिका विशद केली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ टकले ,रामकृष्ण मते ,संतोष देशपांडे  अर्जुन गुंजाळ  विठ्ठल  माने , दत्तात्रय पवार ,सुधीर वाघमारे ,अनिल बारकुल ,राजेंद्र बिक्कड प्रशांत घुटे,यु.सी.शिंदे पिराजी गोरे प्रदिप म्हेत्रे ,अनुराधा देवळे जेमिनी भिंगारे ,वैशाली क्षिरसागर ,राजश्री कुटे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ व श्रीम ज्योती ढेपे यांनी केले तर आभार भक्तराज दिवाने यांनी मानले.
प्रेरणा पुरस्काराने यांचा सन्मान
स्वातत्र्य सेनानी गणपतराव कथले युवक आघाडी कळंब, जिल्हापरिषद केंद्रिय प्राथमिक शाळा (तडवळा ता.उस्मानाबाद), जिल्हापरिषद प्राथमिक शाळा (पिंपळगाव लिंगी ता.वाशी),जिल्हापरिषद प्राथमिक शाळा (भाटशिरपुरा ता.कळंब),जिल्हापरिषद प्राथमिक शाळा (बाभळगाव ता.कळंब )
 
Top