उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील नावजलेल्या अॅडव्हॉन्स कॉम्प्यूटर कॉलेज मध्ये दि.५ मार्च रोजी  वार्षिक स्नेहसंमेलन व निरोप समारंभ कार्यक्रम  मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रस्तुतीकरण करून सर्वांची मने जिंकत, कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी संस्थेचे सचिव  मधुकरराव बोंदर विराजमान होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विक्रम शिंदे (व्यवस्थापनशास्त्र विभाग, विदयापीठ, उपपरिसर उस्मानाबाद), विकास सारफळे (निरीक्षक, भारतीय सुरक्षा बल (बीएसएफ) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये विद्याथ्र्यांनी मराठी, हिंदी गितावर नृत्य, नाटक, एकांकीका आदी सोबत विविध कला-गुणांचे प्रस्तुतीकरण करत सर्वांची मने जिंकली. यावेळी महाविद्यालयात  घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रथम व द्वितीय पारितोषिक देवून पाहूण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरोंनी विद्यार्थ्यां
ना अनमोल मार्गदर्शन करत त्यांना जीवनात व स्पर्धा परिक्षामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  महाविद्यालयाचे प्राचार्य बोंदर व्ही.ए. यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top