तुळजापूर/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांचा अढावा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी घेतला.
या बैठकीत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात पुणे, मुंबई, मोठ्या शहरातून, परराज्यातून,परदेशातून आलेल्या नागरिकाची माहिती देणे. तसेच त्याना सर्दी, खोकला, व अती ताप यासारख्या आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्यानी तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घ्यावी. तसेच काही अडचण आल्यास ग्रामपंचायत स्तरावर कक्ष स्थापन केले आहे तेथे ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक, आशा कार्यकर्ती यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी घरा बाहेर येऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. या बैठकीस अशोक पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते, डॉ. संजय कदम , संजय माने ,यशवंत पाटील ,नारायण पटणे ,गोविंद चुंगे, बसवराज कवठे ,पत्रकार संजय रेणुके उपस्थित होते.
