उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील विधिज्ञ अॅड. सचिन अरुणराव देशपांडे यांचे (45) शुक्रवारी सकाळी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. अॅड. सचिन देशपांडे यांनी उस्मानाबाद नगरपरिषद , बँक ऑफ महाराष्ट्र, अलाहाबाद बँकेचे कायदेशीर सल्लागार म्हणून केले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता उस्मानाबाद येथे कपिलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मोठ्या बहिणी, पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
 
Top