भूम/प्रतिनिधी-
भूम शहरातील शिवजयंती शांतपणे उत्साहात पार पडावी यासाठी पारंपरिक वाद्यांचा उपयोग करावा,  असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांनी केले.
भूम पोलीस ठाण्यात दि 13  फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना विशाल खांबे बोलत होते. यावेळी  पोलिस निरीक्षक रामेश्वर खानाळ, सपोनि मंगेश साळवे, रयत फाऊंडेशन व शिवजयंती उत्सव कमिटीचे सदस्य सोबत विठ्ठल बारते, शेंडगे, प्रतीक मस्कर, समाधान कदम, ऋतिक वीर, गाढवे, अॅड. रवींद्र गुळवे, मुशीर शेख, अखतर जमादार, फिरोज शेख आदींची उपस्थिती होते.

 
Top