उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे बुधवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, कृषी विभाग, उमेद व स्वयं-शिक्षण-प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी संमेलन आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या मेळाव्यास जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 500 महिला शेतकरी व उद्योजक सहभागी होणार आहेत. या मेळाव्यास अध्यक्षस्थानी कुलगुरू वनामकृवि, परभणी डॉ.अशोक ढवण हे तर प्रमुख उदघाटक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे असणार आहेत.
संचालक, अटारी, पुणे डॉ. श्री.लाखन सिंग, संचालक (विस्तार), म.कृ.शि.व.सं.प, पुणे, श्री. विठ्ठल शिर्के, संचालक,विस्तार शिक्षण,वनामकृवि, परभणी, डॉ. श्री. देवराव देवसरकर, विद्यापीठ कार्यकारिणी समिती सदस्य, वनामकृवि, परभणी, श्रीमती पवित्राबाई सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीजमाता, अहमदनगर, पद्मश्री श्रीमती राहीबाई पोपेरे आणि तुळजापूरमधील मसला गावच्या प्रगतशील शेतकरी श्रीमती शैलजा नरवडे या असणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठातील शास्त्रज्ञ पोषणमूल्य आधारित शेती पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी विद्यापीठातील इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
तरी या महिला शेतकरी मेळाव्यास जास्तीत जास्त महिला शेतक-यांनी, उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर प्रा. श्री. सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.