तेर/प्रतिनीधी-
तालुक्यातील तेर येथून श्री समर्थ शिष्यवर योगीराज श्री.कल्याणस्वामी महाराज यांची पालखी सज्जनगडला बुधवार 12 फेब्रुवारीला प्रस्थान होणार आहे.
त्यानंतर ह्या पालखीचा डोमगाव येथे मुक्काम ,13 फेबु्रवारीला पंढरपूरला मुक्काम  व 14 फेब्रुवारीला पंढरपूरला नगरप्रदक्षिणा व पंढरपूरलाच मुक्काम,15 फेब्रुवारीला सज्जनगड मुक्काम,16 फेबु्रवारीला सज्जनगडला गडप्रदक्षिणा व पालखी मिरवणूक,17 फेब्रुवारीला सज्जनगड येथे दासनवमीनिमीत्त गुलालाचे किर्तन, रामपाठ, हरीपाठ, उपासना व सज्जनगडला मुक्काम ,18 फेब्रुवारीला सज्जनगडहून उस्मानाबाद येथे पालखीचे प्रयाण होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन ह.भ.प.पद्मनाभ व्यास महाराज यानी केले आहे.
 
Top