उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजाभवानी क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे दि.8 व 9 फेब्रुवारी रोजी  उस्मानाबाद जिल्हास्तरीय बॅडमिंटन  स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातील खेळाडू उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्रीकांत साखरे, सदस्य श्री.कुलकर्णी  उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी  उपस्थित खेळाडूंना बॅडमिंटन खेळाविषयी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व खेळाडूंना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते विविध प्राविण्यप्राप्त खेळाडूंना ट्रॉफी, पुष्पगुच्छ, रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
उपस्थित मान्यवर खेळाडू, पालक या सर्वांचे त्रिमूर्ति स्पोर्ट अॅकडमी चे अमोल वांजरे यांनी आभार मानले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विनायक वांजरे, सुशील पाळणे, दिग्विजय वेदांलकार, पियुष पाटील, रितेश ढोंगे, पियुष वेदांलकार आदींनी अथक परिश्रम घेतले. त्रिमूर्ति स्पोर्टस्? बॅडमिंटन अकॅडमीतर्फे खेळाडूंसाठी बॅडमिंटन खेळासाठी लागणारे साहित्य प्रदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
विजयी स्पर्धेक
अजित वेलेगावे, आदित्य पिसे,  अजित वेलेगावे , आदित्य पिसे,  प्रसाद जोशी , प्रवीण चव्हाण, नेहा अहिरवाल, पायल ढवळे, ,डॉ. दीपिका सस्ते , श्रेया कानडे, पलक कोठारी, पायल ढवळे, अर्जुन बिरासदार, जय प्रसाद जोशी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकाविला.

 
Top