राज्य सरकार च्या विरोधात भाजपाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.हे आंदोलन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विक्रांत संगशेट्टी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या आंदोलनात पं.स.सदस्य वामन डावरे, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर परसे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, शंकर अप्पा मुळे, हाजी बाबा शेख, बालजी चव्हाण, प्रमोद पोतदार, आशोक तिगाडे, काशीनाथ घोडके, सिध्दु गोफणे, युवराज जाधव, नागनाथ लोहार, सचिन सुर्यवंशी, संतोष कुंभार, कलयाण ढगे, अनिल पांचाळ, रवि परसे, गणेश पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपसथित होते.