भूम/प्रतिनिधी-
भूम नगर परिषद अंतर्गत शहरात ५०० घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. बहुतेक घरांचे बांधकाम प्रगती पथावर आहेत. लाभार्थी रमेश वारे यांचे घराचे बांधकाम सर्वप्रथम झाल्यामुळे त्या घराची वास्तूशांती जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा उपनगराध्यक्षा सौ. संयोगीता गाढवे यांच्या स्व:खर्चातुन करण्यात आली.
सौ. गाढवे यांनी आगळा-वेगळा उपक्रम राबविल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. सुप्रिया वारे, नगरसेविका मेहराज सय्यद  टकले यांची उपस्थिती होती.


 
Top