तुळजापूर/प्रतिनिधी-
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि  15 फेब्रुवारी 2020 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी   माहीती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी दिली.
वासंतनगर येथे सेवालाल जयंतीनिमित्त  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत भजन,  किर्तन, बंजारा नृत्य, महिला बंजारा संस्कृती वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यातील विजेत्या स्पर्धकांना पाच हजार,  तीन हजार, दीड हजार रुपये रोख रकमेचे बक्षिसे देण्यात येणार आहे.
 या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवाव, असे आवाहन जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले. या बैठकीस हरिष जाधव ,वैभव जाधव, संजय राठोड , लक्षमण राठोड,  बालाजी राठोड , अमृता चव्हाण, शिवाजी राठोड, संतोष चव्हाण, लखन चव्हाण, कुमार राठोड, प्रा. सुभाष राठोड, चांगु राठोड, लक्ष्मण राठोड, दत्ता राठोड, मोतीराम पवार, सुरेश राठोड, निरंजन राठोड, श्रीमंत चव्हाण, विलास राठोड, रामाजी राठोड, रवि राठोड , जगदीश राठोड, शुभम राठोड, प्रभाकर जाधव सह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
 
Top