परंडा/प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्हा तालीम संघ सब जूनियर व वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धा येडशी येथे संपन्न झाली .या स्पर्धेमध्ये 43 किलो वजनी गटातून येथील कल्याणसागर  माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी वर्गातील कु.रोहिणी नारायण माळी़ या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रक्रमांक मिळवला आहे. विभागीय पातळीवर होणा-या 43 किलो वजन गटात तिची निवड झाली आहे.
 या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंहजी ठाकूर संस्थेच्या सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी मार्गदर्शक विकास कुलकर्णी कल्याण सागर माध्यमिक विद्यालय डोमगाव चे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड यांनी या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले .तिचे पालक  नारायण माळी क्रक्रीडा शिक्षक चंद्रकांत तनपुरे  सहशिक्षक मुकुंद भोसले,महादेव नरूटे, अजित गव्हाणे, रोहित रासकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूचे परिसरातून कौतुक होत आहे.

 
Top