उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवजयंतीच्या निमित्ताने  उस्मानाबाद शहरातील   मुस्लिम नागरिकांच्या वतीने  शहरातील ताज चौक, दर्जा परिसरात दि.15 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या हस्ते होणार आहे यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक प्रकाश जगताप, उस्मानाबाद शासकीय आयुर्वेद काँलेजचे विभाग प्रमुख डॉ. एम.जे .कादरी, डॉ. शकील अहेमद खान, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अँड.योगेश सोन्ने - पाटील, जेष्ठ  नागरिक जमशेद अहेमद मोयोद्दीन, सनदी लेखपाल लतीफ शेख, सह्याद्री फाऊंडेशन्सचे संस्थापक डॉ. दापके- देशमुख दिग्गज, धनंजय रणदिवे , चंद्रसेन देशमुख,  शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे , जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष खंडू राऊत, इ. मान्यवरांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ररक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 
Top