उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सध्याच्या धावपळीच्या युगात महिला आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष करतात. घरासह विविध कष्टाची कामे महिलांना करावी लागत आहेत. मात्र महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यामुळे महिलांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून निरोगी आरोग्यासाठी दक्ष रहावे, असे आवाहन सह्याद्री फाँडेशनच्या सचिव डॉ. वसुधा दापके-देशमुख यांनी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या आरोग्य मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. शिबिरात 120 महिलांसह मुलींनी सहभाग नोंदविला. प्रारंभी डॉ. दापके यांचा ग्रामपंचायत सदस्या ज्योती देवगिरे व महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मंगल उमाप, अनु सुतार, ताई पवार, पीलाबाई मोहिरे, संगीता कोल्हे, तुळसाबाई कुंभार, राधा परिट, सिंदुबाई देवगिरे, कोमोदीनी कासार, मुक्ताबाई देवगिरे, अंजली मसे, दैवशाला मसे, अनिता परिट, रेश्मा शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र कापसे यांनी केले.
 
Top