तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामसेवा संघाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवा संघाचे अध्यक्ष अॅड. बालाजी भक्ते,  नरहरी बडवे, हरी खोटे, तानाजी पिंपळे सर, राजभाऊ माने, नवनाथ पांचाळ, गोपाळ थोडसरे , विठ्ठल  आंधळे, विजय थोडसरे, श्याम ठोंबरे, प्रमोद रोहिदास, सारंग पिंपळे, अमर गोडसे, सिद्धार्थ कसबे मयूर लोंढे, रवि पवार, अशोक पवार, बापू नाईकवाडी, इर्शाद मुलानी  उपस्थित होते.

 
Top