कळंब /प्रतिनिधी  -
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या वतीने कळंब ( जि.उस्मानाबाद ) येथे प्रथमच दि 1 मार्च ते 5 मार्च 2020 दरम्यान  राज्यस्तरीय मांजरा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कळंब - बार्शी रोड वरील न.प च्या 6 एकर विस्तीर्ण मैदानावर हा महोत्सव भरत असुन प्रदर्शन उभारणी चे काम  श्री ईव्हेंट अँड एक्झीबिशन्स, इंदापूर जि पुणे हे पाहात आहेत. यामध्ये शेतीसाठी लागणारी अवजारे, नामांकित कंपन्यांचे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर्स, सोलार पंप, सेंद्रिय शेती, फळ प्रक्रिया व भाजीपाला लागवड, शेती विषयी पुस्तके, परदेशी भाजीपाला लागवड, महिला बचतगटांच्या वस्तू व खाद्यपदार्थ, शेतीविषयक शासकीय योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे.
याला जोडुनच शेतीविषयी तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चा-सत्रे, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, व्यसनमुक्ती व शेतकरी अत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन व आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे सर्वात बुटकी गाय  राहणार असून पशु-पक्षी प्रदर्शन, पोल्ट्री व्यवसाय, आनंद नगरी इ चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आदर्श शेतकरी, कृषिकन्या, उत्कृष्ट स्टॉलचा सत्कार करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कृषी मेळावा कळंब येथे प्रथमच भरविला जात असुन तो पाहण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश ठेवला आहे.
सोमवार दि 2 मार्च रोजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून गुरुवार दि 5 मार्च रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे.  या कृषी महोत्सवा मध्ये 150 स्टॉल्स उभारले जाणार असून स्टॉल्स बुकिंग साठी  मोबाईल नंबर 9422464039  व 8446771008 तसेच 9850001755 वर संपर्क साधावा.
 तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी अध्यक्ष रो हर्षद अंबुरे, सचिव हनुमंत चौधरी व प्रोजेक्ट चेअरमन रो डॉ रामकृष्ण लोंढे यांनी केले आहे.

 
Top