उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील बार्शी ते लातूर रोडवर २० नोव्हेंबर २०१६ रोजी बैलगाडी व कंटेनर दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत २ पुरूष, २ महिला व एक लाहान मुलाचा मृत्यू झाला तर अन्य पाचजण जखमी झाले होते.  तसेच  दोन बैल व एक शेळी ही दगावली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एन.एच मकरे यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने विविध कलामा आधारे आरोपी कंटेनपर चालक बशीर अहमेद मुस्ताकअली यास सात वर्ष सश्रम करावास व ५५ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा दि.१० जानेवारी २०२० रोजी सुनावली. आरोपी ही शिक्षा एकत्रीत भागोवयाची आहे.
या संदर्भात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड.आशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील ढोकी येथील बार्शी ते लातूर रोडवर २० नोव्हेंबर २०१६ रोजी बैलगाडी व कंटेनर दुर्घटना झाली होती. चालक बशीर मुस्तकाअली  हा भरधाव वेगाने कंटेनपर चालवत होता, त्यानें दोन बैलगाडयांना धडक  दिली. या दुर्घटनेमध्ये बैलगाडीतील राजाराम बाबुराव काळे (रा.ढोकी), याकुब रहेमान पठाण (रा. ढोकी) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भरधाव वेगातील हा कंटेनपर न थांबता पुढे जावून त्या कंटेनर ने दोन महिला व एका मुलगा उडवले. यामध्ये अनिस फतिमा पठाण, मसिरा ईप्तेकार पटेल, उमेर ईप्तेकार पटेल (तिघेही रा. ढोकी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर महपती दुरांडे, स्वाती अण्णा दुुरांडे, अनिकेत अण्णा दुरांडे, सोमनाथ अण्णा दुरांडे हे पाच जखमी झाले होते. तसेच दोन बैल, एक शेळी ही दगावली. या प्रकरणी नाजेर खैरात अली सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा २० नाव्हेंबर २०१६ रोजी  नोंद झाला. सपोनि किशोर सोमनाथ मानभव यांनी या प्रकरणाचा तपास करून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश यांच्या न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपत्र दाखल केले.  या प्रकरणात एकुण सरकारी पक्षाकडून एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये  फिर्यादीचा जबाब व प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष, वैद्यकीय अहवाल व अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. आशिल कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवादाच्या आधारे आरोपीस विविध कलामाखाली वरील शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. महेंद्र देशमुख व अॅड.आशिष कुलकर्णी यांनी काम पाहिले.
 
Top