उस्मानाबाद/प्रतिनिधी-
प्रहारचे अकोला येथील माजी जिल्हाध्यक्ष तुषार  फुंडकर यांच्या मारेक-यांना  कठोर शिक्षा करा या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने रविवार २३ फेब्रुवारी रोजी  जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. या संदर्भात लवकरच कारवाई न झाल्यास  लवकरच प्रहार संघटना सर्व तालुकास्तरावर आक्रामक आंदोलन करेल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्यकार्यकरिणी सदस्य (महाराष्ट्र राज्य) तथा जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,  बाळासाहेब कसबे (जिल्हा संघटक) बप्पा काशिद ,बाळासाहेब पाटील, महादेव खडालकर, रमेश सूर्यवंशी, सचिन जाधव, नारायण सालुंखे, जमीर शेख, राजेश भिसे, दत्ता कांबळे, शिवलिंग घोडके व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top