लोहारा/प्रतिनिधी
देशातील विविध कंपन्यासोबत करार करुन रोटरी क्लब 10 टक्के विकासकामात सहभाग नोंदविणार आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब  2021 - 2022 के अध्यक्ष शेखर मेहता  यांनी केले.
उमरगा रोटरी क्लबला शेखर  मेहता यांनी भेट देवुन सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे होते. तर प्रमुख म्हणुन रोटरीचे अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद देवरकर, सचिव प्रा.युसुफ मुल्ला, प्रा.डॉ.संजय अस्वले, हरीप्रसाद चंडक, नितीन होळे आदींची उपस्थित होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.पोफळे व सुत्रसंचालन प्रा. देवरकर यांनी  केले. तर आभार प्रा. युसुफ मुल्ला यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत कुलकर्णी, प्राचार्य शिवानंद दळगडे, डॉ. राजकुमार कानडे, डॉ. सिद्राम ख्याडे, डॉ. पंडित बुटुकने, डॉ.सुचेता पोफळे, डॉ.शशी कानडे, डॉ.मीनाक्षी डिग्गीकर, डॉ.विक्रम आळगेकर, सौ.कविता अस्वले, सौ.वसुंधरा देवरकर, सौ.महेजबीन मुल्ला, सौ.गिरीबा, सौ. तुपे, प्रा.डॉ.रवी आळंगे, शमीम पठाण, पृथ्वीराज पाटील, प्रदीप पाटील, डॉ. शिवशंकर हरळय्या. प्रा. किरण सगर, मनीष सोनी, प्रदिप चालुक्य, श्रीशैल तुपे, मुस्तफा इनामदार, अमर परळकर, सतीश साळुंके, अनिल मदानसुरे, दिपक कवठे, जुगलकिशोर खंडेलवाल, संजय ढोणे, शिवकुमार दळवी आदींनी यासाठी पुढाकार घेतला.

 
Top