उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा शहरातील प्रेरणा नगर येथील गिरीराज बालविकास केंद्रात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प.महेश महाराज माकणीकर यांच्या हस्ते झाले. स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले. श्री. गणेशा आरती गितावर अजित घोडके या चिमुकल्यांनी दाद मिळविली.
 यावेळी डॉ.महेश घोडके, सुंनदा भुरे, प्रा.परमेश्वर सूर्यवंशी, बळीराम नांगरे, कृषी अधिकारी सारिका लोकरे, माजी प्राचार्य डी.ए.सूर्यवंशी,  विठ्ठल घोडके, रेखा घोडके, तानाजी घोडके, शिवदास कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिकांंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेख यांनी सूत्रसंचालन केले तर आभार श्री.भुरे यांनी मानले.

 
Top