तुळजापूर/प्रतिनिधी
वर्धा जिल्हयातील हिंगणघाट येथील पिडीत महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी व या प्रकरणातील आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा मिळावी यासाठी श्री तुळजाभवानी देवीस शहरातील विविध महिलांच्या संघटना व महिलांनी प्रार्थना करून महाआरती केली. यावेळी या घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी नवनिर्मिती बहुउद्देशिय सामाजिक संस्था, प्रेरणा महिला बचत गटाच्या अध्यक्षा मिनाताई सोमाजी , अंकिता पवार,  सोनाली डोईफोडे , लत्ता सोमाजी, उर्मिला महामुनी,  अॅड. अंजली साबळे ,  सोनाली सोमाजी, प्रियंक पंडीत , अर्पणा देवळलकर या पदाधिका-यासह शहरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

 
Top