वाशी /प्रतिनिधी-
कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची  जयंती कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे महाविद्यालय व छत्रपती शिवाजी विद्यालयात विविध उपक्रमांनी मोठया  साजरी करण्यात आली.प्रारंभी कर्मवीरांच्या पुतळयांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी ,भाजप नेते नगरसेवक सुरेश बप्पा कवडे ,नगरसेवक प्रसाद जोशी ,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे , महमद मुजावर ,विशाल महामुनी प्राचार्या शारदा मोळवणे, मुख्याध्यापक दत्तात्रय कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला. दिंडी पथक, झांज नृत्य,टिपरी नृत्यू ,लेझीम पथक ,वेशभूषा व प्लास्टिक बंदीवर चित्ररथ आदि उपक्रम वाशी नगरीतून मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला.सदरील कार्यक्रमाला वाशीतील पालकांनी उपस्थित राहून कौतुकाने दाद दिली. गावातील इंजिनिअर नंदकुमार कवडे ,शोएब काझी ,योगेश विश्वेकर ,विशाल महामुनी ,भारत बप्पा मोळवणे,राहुल कवडे,मच्छिंद्र माने ,एस.ए कांबळे व इतरांनी खाऊ व पाणी वाटप केले .
 सुत्रसंचलन प्रा.एम.डी.उंदरे, एस.बी.छबिले  यांनी केले तर आभार प्रा.डोके सर ,  पी.ए कांबळे यांनी व्यक्त केले.
 
Top