उस्मानाबाद/प्रतिनिधी- प्रतिवर्षाप्रमाणे उस्मानाबाद कोषागार कार्यालयात  लेखा व कोषागार दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर, व्याख्याने, कार्यालयाची रंगरंगोटी, उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार वितरण, गुणवंत पाल्य गौरव सोहळा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी आयोजित आरोग्य शिबिराचा जवळपास 150 अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आले.तर दुपारच्या सत्राच्या कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.उस्मानाबाद श्री.सुरेंद्र केंद्रे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद तहसिलदार श्री. गणेश माळी,तसेच सहाय्यक संचालक, स्थानिक लेखा निधी, श्री. किरण घोटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अनिल सूर्यवंशी आणि माजी कोषागार अधिकारी श्री.रजवी,श्री.आयचित आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कोषागार अधिकारी श्री. सचिन इगे यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पर कोषागार अधिकारी श्री.चंद्रशेखर काजळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पर कोषागार अधिकारी श्री. निलेश साखरे व सौ.पूजा दळवे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी कोषागार कार्यालयातील सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.

 
Top