
उस्मानाबादेतील औद्योगिक वसाहतीमध्ये
उद्योग करण्यासाठी एक ही प्लॉट शिल्लक नाही, गरजूवंत उद्योजकास प्लॉट मिळत नाहीत, कांही प्लॉट उद्योग संघटनेच्या कांही पदाधिका-यांच्या नावे आहेत, असे पत्रकारांनी सांगताच माजी मंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी राज्याच्या उद्योग मंत्र्यासोबत लवकरच एक बैठक उस्मानाबादेत आयोजित करून सर्व प्रश्र मार्गी लावू, असे पत्रकार परिषदेत सांगितले.
उस्मानाबाद शहरात उभारलेल्या गांधी स्मृती भवनात जिल्हा कॉंग्रेस कार्यालयातील नुतनीकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड.धीरज पाटील,माजी अध्यक्ष विश्वास शिंदे, अप्पासाहेब पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव आदींची उपस्थिती होती. अॅड. धीरज पाटील यांनी जिल्हयात ग्राम कॉग्रेस कमिटी व वॉर्ड कॉंग्रेस कमिटीचे पुर्नगठण करून प्रत्येक गावात शाखा काढत आहोत, बसवराज पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार चे चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कॉंग्रेस संघठना काम करेल, असे सांगितले. यावेळी पीक विमा, शेतक-यांची नुकसान भरपाई यावर चर्चा करण्यात आली. उस्मानाबादेत टेक्स्टाइल टेक्निकल हबसाठी राज्यात सरकार ने केंद्र सरकारला शिफारस करने महत्वाचे आहे, असे नुकतेच भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आपले सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का ? यावर मधुकरराव चव्हाण आणि बसवराज पाटील यांनी राज्य सरकार केंद्र सरकारला निश्चतपणे शिफारस करेल, परंतू गेल्या दहा वर्षांपासून तेच ते आम्ही ऐकत आहोत, असे सांगितले. यावेळी दर्शन कोळगे, खलिल सय्यद, माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे आदींची उपस्थिती होती.