उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सत्तेचा वापर करण्यात येईल. नवीन युवकांना संघटनेत स्थान देण्यात येईल, अशी ग्वाही युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
तांबे यांनी आढावा बैठक घेतली. त्यांनी तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर दर्ग्यात जाऊन चादर चढवली. यानंतर पदाधिकारी बैठकीत हजेरी लावून मार्गदर्शन केले. यावेळी तांबे बोलत होते. व्यासपिठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील आदी पदाधिका-यांची उपस्थिती होती.
तांबे म्हणाले की, सर्वांनी सोबत राहून काम करावे.आगामी काळात पक्षाचे संघटना मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे जिल्हा परिषद स्तरावर चांगल्या काम करणाऱ्या युवकांना मोठ्या पदांवर बढती देण्यात येईल. जिल्हा प्रभारी विनोद भोसले यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रास्ताविक रोहित पडवळ यांनी केले. त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात एकही आमदार नाही यावेळी पडत्या काळात आपण साथ द्यावी, अशी विनंती सत्यजित तांबे यांना केली. आभार प्रदर्शन चंद्रशेखर पवार यांनी मानले. यावेळी प्रवीण देशमुख, अवधूत क्षीरसागर, शशिकांत निरफळ, मकरंद डोंगरे, अण्णा महानवर, दर्शन कोळगे, रोहन जाध, अजय खरसाडे, अग्निवेश शिंदे उपस्थित होते.

 
Top