उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराजस्व अभियानामधील विस्तारित समाधान योजनेंतर्गत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट दिवशी ग्राम किंवा मंडळ स्तरावर महिन्यातून एका विशिष्ट पूर्वनियोजित दिवशी एकत्र यावे व जनतेला शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही करावी,अशा शासनाच्या सूचना आहेत.
त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता प्रथम शिबिरादरम्यान विविध विभागांच्या विविध योजना, अपेक्षित लाभार्थी अर्जाचा नमुना,आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहितीपत्रके, पोस्टर्स/बॅनर्स तयार करून लाभार्थ्यांकडून मेळाव्यादरम्यान अर्ज स्विकारणे व तात्काळ लाभ वितरित करण्यायोग्य प्रकरणात तात्काळ लाभ देणे तसेच दुसऱ्या शिबिरादरम्यान प्रथम शिबिरावेळी व तद्नंतर प्राप्त अर्जावर कार्यवाही करून योजनेचा लाभ/प्रमाणपत्र/साहित्य वाटप करणे, हे अपेक्षित आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या विस्तारीत समाधान योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन उस्मानाबाद तालुक्याचे तहसिलदार विजय अवधाने यांनी केले आहे.
असे संपन्न होणार शिबीर
प्रथम शिबिर - माकणी, दि.28 फेब्रवारी 2020,सकाळी 10.00 वाजता, धानुरी , दि.5 मार्च 2020, सकाळी 10.00 वाजता. जेवळी , दि. 11 मार्च 2020, सकाळी 10.00 वाजता. लोहारा, दि. 13 मार्च 2020. द्वितीय शिबिर - माकणी, दि.17 मार्च 2020,सकाळी 10.00 वाजता, धानुरी , दि.20 मार्च 2020, सकाळी 10.00 वाजता. जेवळी, दि.31 मार्च 2020, सकाळी 10.00 वाजता. लोहारा, दि. 26 मार्च 2020,सकाळी 10.00 वाजता