उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दि.27 फेब्रुवारी हा जन्मदिन " मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे आज दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00वाजता "मराठी भाषा गौरव दिन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, ज्येष्ठ साहित्यिका कमलताई नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री.निपाणीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेव आघाव, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,जेष्ठ पत्रकार श्री.सय्यद,श्री.धनंजय रणदिवे,श्रीमती शीला उंबरे,श्री.गोविंदसिंह राजपूत,नगर वाचनालयाचे श्री.जावळे,अतुल जगताप  आदींची उपस्थिती होती.
 या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" या मासिकाच्या फेब्रुवारी महिन्याच्या "मराठी भाषा विशेषांकाचे" प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थितांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सामूहिक मराठी भाषा प्रतिज्ञा घेतली. याशिवाय ज्येष्ठ साहित्यिका कमलताई नलावडे यांचे " मराठी भाषेची महती"  या विषयावरील विशेष व्याख्यान तर जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांची समयोचित भाषणेही झाली.
या कार्यक्रमास मराठी भाषा प्रेमींनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, समाजसेवी संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी  मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उस्मानाबाद, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले होते.
 
Top