उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गटबाजीच्या राजकारणा मुळे पक्ष वाढायचा तर सोडा पक्ष संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. सुरवातीच्या काळात पक्षाने चांगली भरारी घेतली होती. भुम नगर परिषद मध्ये 1 नगरसेवक निवडून देखील आला होता.
 जिल्हाध्यक्ष कै.अनिल बंटी मंजुळे आसताना पक्ष चांगल्या पद्धतीने वाढत होता, नंतर त्यांनी ही गटबाजीमुळे भाजपामध्ये प्रवेश करून नगरसेवक झाले होते. त्याच्यानंतर इंद्रजित देवकते यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते पण तेही गटबाजी मुळे भाजपावाशी झाले परत राजेंद्र गपाट यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. गपाट यांच्याकडे उस्मानाबाद-कळंब विधानसभा या दोन्ही तालुक्याची जबाबदारी देण्यात आली पण राजेंद्र गपाट हे वाशी तालुक्यातील इंदापूर गावातील रहिवासी असल्याने उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील महत्वाचे पदाधिकारी नाराज झाले, त्यामुळे गटबाजी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, पक्षात बरच निष्ठावंत पदाधिकारी यांना पदावरून काढून टाकले आहे .नविन प्रवेश केलेल्या कार्यकत्र्यांना महत्वाची पदे देण्यात आल्यामुळे मनसेत पक्षात प्रचंड गटबाजी वाढली आसल्याचे चिञ दिसत आहे. लवकरात लवकर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी उस्मानाबाद जिल्ह्यात लक्ष घालून गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अन्यथा इतर ठिकाणी महाराष्ट्रात पक्षाला भविष्यात चांगले दिवस येतील पण उस्मानाबाद जिल्ह्यात नावापुरती मनसे राहिल, बोलले जात आहे.

 
Top