
शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थींनी स्वत: लिहिलेल्या कवितांच्या डिजीटल बॅनरचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर विद्यार्थीनी आस्मिता मदने, समता ठाणांबीर, तन्वी माने, नोबल जाधव, अनुष्का गाडे यांनी कवितांचे सादरीकरण केले तसेच मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी क्रआईञ्ज कवितेचे सादरीकरण केले. सौ.बावकर उज्वला यांनी कवितेचे गायन केले.
यावेळी स्वप्नील कार्लेकर,प्रा.शंकर माळी यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आयडीबीआय बँकेचे मॅनेजर स्वप्नील कार्ले कर, शाळेचे माजी विद्यार्थी प्रा.शंकर माळी, सोनागिरीचे पालक धनाजी गणगे , राजाभाऊ गोयकर यंाची उपस्थित होती. सूत्रसंचालन पायघन यु.पी.यांनी केले. आभार प्रदर्शन हरिश साठे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख््येने उपस्थित होते.