तुळजापूर/प्रतिनिधी-
शहरातील नव्या बसस्थानकाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी भाषा गौरव दिन" गुरुवार दि.27 रोजी मोठ्या उत्साहात    साजरा करण्यात आला. प्रारंभी नव्या बसस्थानकामध्ये वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.  त्यानंतर प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन बसस्थानकांमध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम , शहराध्यक्षा किरण चौधरी,  शिक्षक सुनिल लोंढे , राजकुमार दिवटे बसस्थानक प्रमुख बी. एस. राठोड, आर. आर जगताप, श्री. यादव,श्री पवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान श्रीकांत कदम,  किरण चौधरी, सुनिल लोंढे, अश्विनी जगताप आदींनी  मार्गदर्शन केले.
 प्रास्तविक , सुञसंचलन व आभार आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांनी मानल.े  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुटराव एस.एस. कुलकर्णी,बारकुल, बसस्थानकातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मराठी भाषा प्रेमीं विद्यार्थी -कर्मचारी, नागरिक मोठ्या संखेने उपस्थिती होते.

 
Top