लोहारा/प्रतिनिधी
शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलच्यावतीने कै.ल.ना.श्रीगिरे व कै.डॉ. के.डी.शेंडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 300 रुग्णांची मोफत तपासणी व ओषधे वाटप करण्यात आली. या शिबिरात  रक्तातील साखर, रक्तदाब, हिमोग्लोबिन, ईसीजी, एक्स-रे आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.या शिबिरात डॉ. सचिन शेंडगे, डॉ.दयानंद चौरे, डॉ.सौ.वसुधा दापके - देशमुख, डॉ.सौ.प्रियांंका चौरे, डॉ. श्रीकांत बलवंडे यांनी रूग्णांची तपासणी केली.
या शिबिराचे उद्घाटन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी  (लोहारा) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.डि.एस थिटे हे होते. तर प्रमुख म्हणून माजी सरपंच नागण्णा वकील, माजी पं.स.सदस्य चंद्रकांत पाटील, नगराध्यक्षा सौ.ज्योती दिपक मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके (लोहारा), माजी सरपंच शंकर जट्टे, माजी उपसरपंच व्यंकट घोडके, जालिंदर कोकणे, एड.गणेश वैरागकर, डॉ.हेमंत श्रीगिरे, डॉ.सौ.रुपाली श्रीगिरे, निळकंठ कांबळे, गिरीश भगत, श्रीमती वर्षा चौधरी, उत्तम पाटील, एसबीआय बँक मँनेजर सुमित्रा सिन्हा, राम कुलकर्णी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. हेमंत श्रीगिरे व  सुत्रसंचालन जी.के.घोडके यांनी केले. तर आभार डॉ.सौ.रुपाली श्रीगिरे यांनी मानले.

 
Top