उस्मानाबाद/प्रतिनिधी-
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे वक्तृत्व,निबंध,चिञकला,टॅलेंट,सुगम गायन विविध गटातील
 मराठवाडा विभागीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 30जानेवारी रोजी सायं 4 वाजता संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम.डी.देशमुख(शिक्षणतज्ञ,उस्मानाबाद)हे होते,अध्यक्षस्थानी मराठवाडा विभाग प्रमुख मा.प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते. डॉक्टर बापूजी साळुंखे निबंध वक्तृत्व चित्रकला टॅलेंट समूह गायन या स्पर्धा स्वामी विवेकानंद सप्ताहामध्ये दिनांक 12 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान संस्थेच्या विविध शाखेवर अगोदर  संपन्न झाल्या होत्या.त्यातील पहिल्या तीन क्रमांकांचे विजेते स्पर्धक विभागीय स्पर्धेला पाञ झाले होते.आज सकाळी दहा वाजता  वक्तृत्व स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले होते. विविध गटांमध्ये म्हणजेच, इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक गट, इयत्ता आठवी ते दहावी माध्यमिक गट, अकरावी-बारावी ज्युनिअर कॉलेज गट, महाविद्यालयीन गट, व प्राध्यापक, शिक्षक यांच्यासाठी गुरुदेव कार्यकर्ते या गटांमध्ये स्पर्धा संपन्न झाल्या.   यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बीड, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते विविध गटातील वक्तृत्व स्पर्धा सकाळी 11 वाजता सुरू झाल्या दुपारी चार वाजता विविध गटातील विविध प्रकारात घेतलेल्या स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना  प्रमुख पाहुणे.मा.एम.डी.देशमुख शिक्षण तज्ञ ,उस्मानाबाद यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव  देशमुख होते.
या विविध प्रकारातील व विविध गटातील मराठवाडा विभागीय स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना प्रथम क्रक्रमांकास रू 451, द्वितीय क्रक्रमांकास 351 रू. तृतीय क्रमांकास 201 रूपये व  संस्था सन्मानचिंन्हा, संस्था प्रमाणपञ देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक स्पर्धा संयोजक प्रा.राजा जगताप यांनी केले सूञसंचालन प्रा.पी.डी.क्षीरसागर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक वागतकर एस,एच, प्राचार्य पी.एस.देशमुख आदी उपस्थित होते.
विविध स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक 
टॅलेंट स्पर्धामध्ये-  दुधभाते प्रेरणा , मोर पाटील , मोरे सुबुध्द, साळुंखे अविनाश, गावदे तन्मय, घुगे स्वराज लऊळ निंबध स्पर्धेत-कोंडकर दिक्षा, राजनंदिनी जगताप, कांबळे प्रणव , संतोष माळी, श्रेया गरदडे, अर्पिता शिंदे , स्वाती पन्हाळे , मोहिणी कुलकर्णी, वरूणा मदने , आकांक्षा पांचाळ , लोखंडे शेखर ,  साक्षी साठे , संतोष पोतदार , राजेंद्र पवार , संतोषी सुरवसे वक्तृत्व स्पर्धेत - ऐश्वर्या गोटुरे, शंभुराजे जळके , सत्यपाली ओहळ ,अर्जुनराव अमृतराव , रूतिका नाईक ,आरती मराठे ,अंकुर माळी , शुभांगी शिंदे , वरूणा मदने , प्रीती शेवंते ,अर्पणा झाडके, प्रतिक्षा मुंढे , प्रा.माधव उगीले , प्रा.मच्छिंद्र नागरे , प्रा.विवेक कोरे चिञकला स्पर्धेत - निकिता व्हटकर , समर्थ कुंभार, सानिका कुंभार, ताहेरा शेख , शुभश्री जाधव , कांचन भोंग , खापरे वृक्षाली , अनिकेत जेटीथोर , सिध्दनाथ जानराव , दिपाली बिराजदार,पांडूरंग राजगुरू , अर्पिता वरपे  सुगम गायन स्पर्धेत-दिव्या क्षीरसागर, मशिरा तांबोळी , श्रावणी आकुसकर काजळा,अर्पिता शिंदे , श्रावणी पवार ,आरती रेडे आदींना स्पर्धेत यश मिळाले.
 
Top