मुरूम/प्रतिनिधी-
दूरसंचार विभाग व भारत संचार निगम लिमिटेडचे उस्मानाबाद कार्यालयातील कनिष्ठ अभियंता रफिक इमामसाहेब इमडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा दूरसंचार प्रबंधक व्यंकोबा बोयने यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
 उस्मानाबाद येथील दूरसंचार प्रशासकीय इमारतीत शुक्रवारी निरोप समारभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा  अभियंता धनंजय कुलकर्णी व अभियंता श्री इरले उपस्थित होत.े बी.एस.एन.एलने देशात स्वेच्छानिवृत्ती योजना काढली होती श्री इमडे यांनी बी एस एन एल या विभागात 35 सेवा केली व योजनेतून निवृत्ती घेतली. या योजने  अंतर्गत जिल्ह्यातील 57 अधिकारी व कर्मचा-यांनी निवृत्ती घेतली.
 
Top