वाशी/प्रतिनिधी-
संत मिरा पब्लिक स्कूल मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतमिरा पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा सौ.शिल्पा पाटील ह्या अध्यक्षस्थानी होत्या. सुरुवातीला तुळजाभवानी माता यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.शिल्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासोबतच शाळेमध्ये विविध प्रकारचे स्पर्धा आयोजित करण्यात होत्या. या स्पर्धेत माता सोबतच आजीनीही सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये विजेत्यांना अध्याक्ष्यांच्या हस्ते बक्षिसे देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ.शिल्पा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल जैन यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी अमृता डोईफोडे, रोहिणी डोरले, पल्लवी चेडे,सोनाली शिंदे व इतर शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी बिजली शिंदे यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top