उस्मानाबाद/प्रतिनिधी
परांडा येथील कल्याण सागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळा परांडा या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 17 फेब्रुवारी 2020 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.  यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार श्री सुजितसिंह ठाकूर , त्यांच्या सौभाग्यवती शैलाताई ठाकूर संस्थेच्या सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी समूहाचे मार्गदर्शक श्री विकास  कुलकर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड संतोष सुर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी परांडा नगरपालिकेचे गटनेते श्री सुबोधसिंह ठाकुर परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत पवार कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किरण गरड आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कृतीक प्रमुख सचिन शिंदे,  गणेश पवार, सौ पाटील रजणी, भारत थिटे, नरसिंग सोनवणे, अमोल कोकाटे, प्रशांत कोल्हे, हरीशचंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.
 
Top