प्रतिनिधी/तुळजापूर-
तुळजापूरचे नाट्य सिने कलावंत दिलीप भोसले हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
यावेळी खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे, निर्माते बाळासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच महाराष्ट्रासह अन्य विविध भागात केले जाणार आहेत. सिनेकलावंत दिलीप भोसले यांनी अनेक नाटयस्पर्धा गाजवल्या आहेत. पंचरंग नाट्य संस्थेचे ते संस्थापक असून, मराठवाडयातील नाटय चळवळ उभी करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातील सिनेकलावंत भोसले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.